prasad konde deshmukh, मोठी बातमी: मराठा महासंघाचे नेते प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर साताऱ्यात गोळीबार – akhil bhartiya maratha mahasangh youth wing vice president prasad konde deshmukh firing attack in satara
Akhil Bhartiya Maratha Mahasangh | प्रसाद कोंडे (Prasad Konde) यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने जीवित कोणाला दुखापत झाली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे .
प्रसाद कोंडे
हायलाइट्स:
साताऱ्यात उडाली खळबळ
प्रसाद कोंडे थोडक्यात बचावले
सातारा: आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद कोंडे – देशमुख यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने प्रदिप कोंडे-देशमुख यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी प्रसाद कोंडे (Prasad Konde) यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने जीवित कोणाला दुखापत झाली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे . (Firing on Akhil Bhartiya Maratha Mahasangh leader Prasad Konde Deshmukh)