मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर आता सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. भूमिपूजन सोहळ्याला कोणाला आमंत्रण असणार याची चर्चा सुरू झाली आहे. उभारणीबाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे अयोध्येला जाणार का, हा प्रश्न आता चर्चिला जात आहे. ( Bhumi Poojan)

वाचा:

अयोध्येत राम मंदिर उभारण्यास सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता तिथं मंदिर उभारण्याच्या तयारीला वेग आला आहे. मंदिराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार याची चर्चा निकाल लागल्यापासूनच सुरू होती. आता ५ ऑगस्ट ही तारीख सरकारनं भूमिपूजनासाठी निश्चित केली आहे. पंतप्रधान हे स्वत: भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं नाव यात सर्वात आघाडीवर आहे.

वाचा:

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना याबाबत भूमिका मांडली. ‘भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण येईल किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही. तो काही आमच्यासाठी मानापमानाचा विषय नाही. कारण आमचं नातं थेट श्रीरामाशी जोडलेलं आहे. निमंत्रण देण्याचं काम आयोजकांचं आहे. ते आल्यास कोणी जायचं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. स्वत: जायचं की आणखी कोणाला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं याचा निर्णय तेच घेतील,’ असं सावंत म्हणाले. ‘प्रभू रामचंद्र हा श्रद्धेचा विषय आहे. त्याला राजकारणाचा रंग देण्याची गरज नाही. पण राम मंदिराच्या निर्मितीसाठीचा पाया रचणारी ही आहे हे लक्षात घ्यायला हवं. संतांचे सर्व आखाडे लढत होते. कायद्याची लढाई सुरू होती हेही आम्हाला मान्य आहे. यात श्रेय घेण्याचा विषय नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेले होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगी देणारी शिवसेना हा देशातील पहिली संघटना आहे,’ याची आठवणही सावंत यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here