Maharashtra Politics | राज्यपाल कोश्यारी येत्या २४ आणि २५ तारखेला दिल्लीला जाणार आहे. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चर्चा होणार का, हे पाहावे लागेल. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्यादृष्टीने काही पावले टाकणार का, हेदेखील बघावे लागेल.

 

Bhagatsingh Kosyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हायलाइट्स:

  • शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान
  • राज्यपाल कोश्यारींना दिल्लीतून तातडीचं बोलावणं
मुंबई:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीने एकमुखाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी येत्या २४ आणि २५ तारखेला दिल्लीला जाणार आहे. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चर्चा होणार का, हे पाहावे लागेल. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्यादृष्टीने काही पावले टाकणार का, हेदेखील बघावे लागेल.

भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोश्यारी यांची कानउघडणी करण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्ये काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?

“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”

Udayanraje Bhosale: देवेंद्र फडणवीसांकडून कोश्यारींचा बचाव, पण उदयनराजे आक्रमक, थेट अमित शाहांकडे जाणार

फडणवीसांकडून कोश्यारींचा बचाव

या सर्व प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांची बाजू लावून धरली होती. या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हिरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here