shraddha death case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. हत्येच्या मुळाशी जाण्यासाठी आणि आफताब पुनावालाविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. आफताबनं श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अतिशय थंड डोक्यानं ३५ तुकडे केले. मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरू नये म्हणून त्यानं ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला.

पोलिसांना आफताबच्या छतरपूर येथील फ्लॅटमधून रफ साईट नोट मिळाली. याच नोटचा उल्लेख दिल्ली पोलिसांनी रिमांडसाठी केलेल्या अर्जात केला आहे. याच नोटचा आधार घेऊन १५० हून अधिक पोलीस जंगलात मृतदेहांच्या तुकड्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना मंगळवारी महरौलीतील जंगलात एक जबडा आणि काही हाडं मिळाली. ती घेऊन दिल्ली पोलीस एका डेंटिस्टकडे पोहोचले. हा जबडा श्रद्धाचाच आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.
हत्येसाठी वापरण्यात आलेली करवत आणि ब्लेड गुरुग्रामच्या डीएलएफ फेज ३ मधील झाडीत फेकल्याचं आफताबनं पोलिसांना सांगितलं. दिल्ली पोलिसांच्या पथकानं दोनदा या ठिकाणी पाहणी केली. १८ नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांचं पथक गुरुग्रामच्या झुडूपांमधून काही पुरावे घेऊन निघालं होतं. हे पुरावे सीएफएसएलकडे पाठवण्यात आले होते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.