Jalgaon News : एरंडोल शहरात दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा आंघोळ करत असताना गॅस गिझरच्या गळतीमुळे बाथरूम मध्येच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी दहा वाजता घडली. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

त्यावेळी यश हा बाथरूममध्ये खाली पडला होता आणि बाथरूममध्ये गॅस गळतीचा वास येत होता. वासुदेव पाटील व दीपक पाटील यांनी यशला ताबडतोब खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. याबाबत दीपक हरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करत आहेत.
चहावाल्याच्या खांद्यावर हात, ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पा; सत्तारांची टपरीच्या बाकावर ‘चाय पे चर्चा’
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.