पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची चर्चा सर्वत्र झाली. यानंतर आज संध्याकाळी त्याच नवले ब्रिजवर पुन्हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, या अपघाताला काही तास उलटत नाहीत तोवर शहरातील भूमकर पुलाजवळ एका कंटेनरने तीन गाड्यांना धडक दिल्याने पुन्हा अपघात झाला असल्याची घटना घडली आहे.

भूमकर पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या समोर हा अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे या कंटेनरने समोरील वाहनांना धडक दिली. कंटेनरने समोरील ३ गाड्यांना धडक दिली यात २ चार चाकी आहेत तर एक Traveller बस आहे. यातील एका चार चाकी वाहनामध्ये एक कुटूंब प्रवास करत होते. सुदैवाने यातील लहान मुलांसह गाडीतील इतर व्यक्तींना काही झालेले नाही. मात्र, कंटेनरची जोरदार धडक बसल्याने गाडीचे टायर फुटले. दरम्यान, कंटेनरचा ड्रायव्हर घटनास्थळी असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतून संतांच्या पुरोगामी मातीचा गंध, विचार देशात नेऊ : राहुल गांधी
दरम्यान, काही तासांपूर्वी नवले पुलावर झालेल्या अपघातामुळे पुलावर अपघात सत्र सुरूच आहे. काल रविवारी रात्री याच नवले ब्रिजवर मोठा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तब्बल ३० गाड्यांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात सहा जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घनास्थळी पोहचले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळ्यामुळे हा भीषण अपघात झाला.

सातारहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रकवरचे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतुक बराच वेळ थांबवावी लागली. पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भागा अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.

महाराष्ट्राला मधुमेहमुक्त करण्याचा निर्धार, डेन्मार्कच्या साथीनं राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार : तानाजी सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here