वाचाः
करोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, याबाबत मला माहिती नाही, राज्य आणि केंद्र सराकारनं लोकांना करोना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.
देशातील धोकादायक शहरांत सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदरही चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. नियोजत भवनात शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैढक घेण्यात आली.
राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर अधिक आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्थिती चिंता वाढवणारी आहे. या तीन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता २१ किंवा २२ तारखेला सोलापूरचा दौरा करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
सोलापूर हे संकटावर मात करणारं शहर आहे. सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळासाठी ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या कानावर घालून सोलापूरसाठी अधिक मदत देणार
खासगी रुग्णांलयातील रुग्णांच्या बील सरकारी ऑडिटर तपासणार, बील व्यवस्थित दिलं जात आहे का त्यावर लक्ष ठेवणार
सोलापूरसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळतेय का याचा आढावा घेण्यात येईल
सोलापूर शहराच्या पूर्व भागात विडी कामगार, हातमाग कामगार असल्यामुळं रुग्ण वाढले
शहरात अँटीजन टेस्ट सुरु करण्यात आल्या आहेत
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times