नाशिक : बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर आज पहाटे ४.४ च्या सुमारास ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

ते म्हणाले की, भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती. तर यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीती आहे.

Municipal Elections : महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर? २४ महापालिकांच्या होणार नव्याने प्रभाग रचना
१२ नोव्हेंबरला दिल्लीत झाला भूकंप…

याआधी १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय राजधानीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळमध्ये संध्याकाळी ७.५७ वाजता ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी खाली असल्याचं सांगण्यात आलं. त्याआधी ८ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

भारतात ९ महिन्यांत ९४८ भूकंप, ४ पेक्षा २४० पट जास्त तीव्रतेचे भूकंप

भारतात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत ९४८ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. हा काही मोठ्या धोक्याचा इशारा आहे का? जेव्हा भूकंपाची तीव्रता ४ पेक्षा कमी असते तेव्हा ते सहसा जाणवत नाहीत. गेल्या ९ महिन्यांत भारतात असे २४० भूकंप जाणवले, ज्याची तीव्रता ४ पेक्षा जास्त होती.

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी, नाराजी दूर होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here