याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान शास्त्र विभागाच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरंच भूकंपाचे सौम्य धक्के बसले का की इतर काही कारणामुळे भूकंप सदृश्य धक्के जाणवले याबाबतची अधिक माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळू शकेल.
Home Maharashtra अहमदनगर न्यूज़ लाइव, नाशिकनंतर राज्यात आणखी एका जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, रात्री अचानक...
अहमदनगर न्यूज़ लाइव, नाशिकनंतर राज्यात आणखी एका जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, रात्री अचानक वाजली दारं, खिडक्या अन् पत्रे – after nashik mild earthquake like tremors were felt at many places in ahmednagar
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेमधील अनेक तालुक्यांत मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजे दरम्यान भूकंपसदृश्य सौम्य धक्के जाणवले आहे. राहुरी, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव व पंचक्रोशीमध्ये मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.