मे महिन्यात झाले होते लग्न…
सुमैया व कलीम या दोघांचे लग्न मुस्लिम धर्मरितीरिवाज नुसार १३ मे २०२२ रोजी लग्न झाले होते. दोन महिने चांगले नांदविल्यानंतर घरगुती कारणामुळे दोघा पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. सुमैया या विवाहित महिलेने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पतीने माझ्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्रास देण्यास सुरुवात केली. सुमैया या विवाहितेचा पती फुलांचा व्यवसाय करतो. व्यवसायासाठी व घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपयांची रक्कम आण असा तगादा लावला होता. तसेच चारित्र्याचा संशय देखील घेत होता.
तीन महिन्याअगोदर पतीने एका कटिंग दुकानधारकाला घरी बोलावून माझे संपूर्ण केस कापले व टक्कल केले. काही दिवसांनी घरात पुन्हा किरकोळ वादविवाद झाले. यानंतर पती कलीम चौधरी याने राहत्या घरी तीन वेळा तोंडी तलाख देत माहेरी आणून सोडले.
तोंडी तीन तलाख देत माहेरी आणून सोडले…
पती कलीम याने पत्नी सुमैया या दोघांत घरगुती कारणावरून २२ दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पती याने तोंडी तीन वेळा तलाख दिला आणि माहेरी आणून सोडले. त्यावेळी सुमैया याच्या आई वडिलांना माहिती झाले की, आपल्या मुलीचे डोक्यावरील सर्व केस काढण्यात आले आहेत. त्यांनी कलीम चौधरी व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पती कलीम याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर मंगळवारी दिवसभर पोलिसांनी सर्व बाबी तपासून, सुमैया याची फिर्याद लिहून घेतली आणि जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पीएसआय राठोड करत आहेत.