नवी दिल्ली: प्रोटीन इगोव, बालाजी स्पेशॅलिटी या दोन्ही कंपन्यांनी डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान नियामकाकडे प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) कागदपत्रे सादर केली होती. त्यांना १५-१७ नोव्हेंबर दरम्यान सेबीची मंजुरी मिळाली आहे. कोणत्याही कंपनीला आयपीओ आणण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते.

आयटी सेवा प्रदाता प्रोटीन इगोव (Protean eGov Technologies) आणि रासायनिक उत्पादक बालाजी स्पेशालिटी केमिकल्स (Balaji Speciality Chemicals IPO) यांना इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे.

गुंतवणूकदारांना बंपर नफा! टेक कंपनीचे शेअर्स ३२% प्रीमियमसह बाजारात दाखल
बाजार नियामक सेबीने सांगितले की, या दोन्ही कंपन्यांनी डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान नियामकाकडे आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. त्यांना १५-१७ नोव्हेंबर दरम्यान सेबीची मंजुरी मिळाली आहे. कोणत्याही कंपनीला आयपीओ आणण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते.

देशातील सर्वात मोठ्या IPO ने गुंतवणूकदारांचा पैसा व्यर्थ! शेअर्स ७८% पेक्षा जास्त घसरले
बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचा आयपीओ
कागदपत्रांनुसार, बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या आयपीओमध्ये २५० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. कंपनीचे प्रवर्तक २,६०,००,००० शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) आणतील.

गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! या कंपनीच्या शेअर्सची IPO इश्यू प्राईसपेक्षा अधिक किमतीवर लिस्टिंग
आपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी ६८ कोटी रुपयांपर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि ११९.५ कोटी रुपयांचा वापर सामान्य व्यावसायिक हेतूंसाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी केला जाईल. कंपनी ५० कोटी रुपयांच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते. असे झाल्यास नवीन इश्शूचा आकार खाली येईल.

प्रोटीन इ गोवचा आयपीओ (Protean eGov Technologies IPO)
प्रोटीन इ गोव (Protean eGov Technologies) च्या आयपीओमध्ये १.२ कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. शेअर्स ऑफर करणाऱ्यांमध्ये आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड, एनएसई इन्व्हेस्टमेंट्स, स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे प्रशासक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, ड्यूश बँक एजी यांचा समावेश आहे. BSE आणि NSE वर दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here