Disha Salian case | बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

हायलाइट्स:
- आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेत्याला बदनाम का केले?
- या सगळ्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी संपली आहे. या चौकशीअंती दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. यासाठी सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, याप्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात होता. बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता सीबीआयने दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निर्वाळा दिल्याने राणेंच्या आरोपांमधील हवा गेली आहे.
नितेश राणे काय म्हणाले होते?
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा (Rahul Kanal) काही संबंध आहे का, याचा तपास झाला पाहिजे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. त्यासाठी तपास झाला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता, असेही नितेश यांनी म्हटले होते.
नारायण राणेंकडून गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.