मुंबई: आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस, आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या शेअर्सची आजपासून बाजारात ट्रेडिंग सुरू झाली आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जीने सूचीबद्ध केलेल्या गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर इश्यू किमतीपेक्षा ७ टक्के घसरणीसह सूचिबद्ध झाले. आयपीओ अंतर्गत ६५ रुपयांच्या प्राइस बँडच्या तुलनेत ते ६०.५० रुपयांवर सूचीबद्ध झाले. सबस्क्रिप्शन दरम्यानही, इश्यूला गुंतवणूकदारांकडून सरासरी प्रतिसाद मिळाला होता.

पैसे तयार ठेवा! आणखी २ IPO ना सेबीचा हिरवा कंदील, घ्या जाणून संपूर्ण तपशील
फक्त १.५ पट सबस्क्राइब झाला
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांनी फारसा रस दाखवला नाही. हा इश्यू एकूण १.५५ पट भरला गेला. ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झालेल्या या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला राखीव भाग ४.७ पट सबस्क्राइब झाला. तर गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव भाग ४७ टक्के भरला गेला. त्याच वेळी, पात्र संस्था खरेदीदारांसाठी राखीव भाग १.०५ टक्के भरला गेला. कंपनीने ६.६७ कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले होते, ज्याच्या विरोधात १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १०.३७ कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती.

देशातील सर्वात मोठ्या IPO ने गुंतवणूकदारांचा पैसा व्यर्थ! शेअर्स ७८% पेक्षा जास्त घसरले
गुंतवणूकदारांबद्दल बोलायचे झाले तर मॉर्गन स्टॅन्ले एशिया (सिंगापूर) पीटीई, नोमुरा सिंगापूर लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस पीटीई लिमिटेड, एचडीएफसी म्युच्युअल फंड (एमएफ), आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफ, आदित्य बिर्ला सन लाइफ एमएफ हे अँकर गुंतवणूकदार आहेत.

गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान; टाटा समूहाचा हा शेअर १०० रुपयांच्या खाली, किंमत ६६% घसरली
कंपनीचा व्यवसाय
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस (Inox Green Energy Services) विंड फार्म प्रकल्पांसाठी (Inox Green Energy Services) दीर्घकालीन ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M) सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही कंपनी प्रामुख्याने विंड टर्बाइन जनरेटर आणि विंड फार्मवर सामान्य पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम करते.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसमध्ये सध्या आयनॉक्स विंडचा ९३.८४ टक्के हिस्सा आहे. अलीकडेच आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसने गौतम अदानी यांची कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीला तीन विशेष युनिट्स (SPVs) मधील आपला संपूर्ण इक्विटी हिस्सा विकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here