मुंबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे एक क्यूट कपल आहे. बॉलिवूड तसेच क्रिकेट जगतातही कपल खूप प्रसिद्ध आहे. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात आणि आपल्या जीवनातील अनेक खास प्रसंग आपल्या चाहत्यांसोबत शेयर देखील करत असतात. दोघे कामानिमित्त एकमेकांपासून लांब जरी असले तरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम ते व्यक्त करायला विसरत नाहीत. टी-२० विश्वचषकानंतर दोघेही पिकनिकला गेलेलं असल्याचे फोटो देखील आपण शोष मीडियावर पहिले. तर असाच एक या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो किचनमध्ये भांडी साफ करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी एकच मजा घ्यायला सुरुवात केली. या व्याल फोटोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटर विराट कोहलीच्या एका हातात डिश वॉशर आहे, तर त्याची बॉलीवूड अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माने त्याला मागून धरले आहे आणि तो डिश वॉशर वर करून दाखवत आहे की काम करत आहे.

वाचा: गुजरात निवडणुकीपूर्वी जडेजाच्या घरात राडा, बहिणीने बायको रिवाबाविरुद्ध केली तक्रार

फोटोमध्ये विराट कोहलीने हाफ लोअर आणि व्हाईट प्रिंटेड टी-शर्ट घातलेला दिसत आहे. डोळ्यांवरचा गॉगल त्याच्या लुकला अधिक साजेसा दिसत आहे. दुसरीकडे, अनुष्का जीन्स आणि टी-शर्टमध्ये आहे. या फोटोवर कमेंट करताना काही लोकांनी विचारले आहे की, तुमचे स्वयंपाकघर अस्वच्छ आहे का? तर काहींनी विचारले – रसोडे में कौन है? एकाने कमेंट केली की बायकोसमोर याचंही काही चालत नाही. बरं, हे जोडपे एकत्र फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे.

हेही वाचा: ‘ही माझी टीम आहे…’, संजू सॅमसनला संधी न मिळाल्याच्या चर्चांवर हार्दिक पंड्या स्पष्टचं

Virat and anushka viral photo of virat washing utensils

माजी कर्णधाराने टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. विराटने यंदाच्या विश्वचषकात आपल्या बॅटने ताबडतोड फलंदाजी करत अनेक विविध आणि नवे विक्रम आपल्या नावे केले. पण टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यासह टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारताचा प्रवास संपला. यानंतर विराट पत्नीसोबत हिमाचलला फिरसाठी गेला. इथून अनेक फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो सामान्य व्यक्तीप्रमाणे चाहत्यांसोबत पोज देताना दिसत होता.

वाचा: गोलंदाजांना ओपन चॅलेंज, १०४३ दिवसांनंतर दणदणीत शतक झळकावत फॉर्ममध्ये आला मॅचविनर खेळाडू

या टी-२० विश्वचषकानंतर सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ज्यामध्ये विराट कोहली, रोही शर्मा आणि केएल राहुलसह प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही समावेश आहे. तर उर्वरित टीम इंडिया न्यूझिलँमध्ये पुढील टी-२० मालिका खेळण्यासाठी रवाना झाली. टीम इंडियाने त्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा दौरा केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० मालिका १-० अशा फरकाने जिंकली, तर पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही.

वाचा: न्यूड होऊन मैदानावर धावणार होती प्रसिद्ध मॉडेल, पण स्वप्न अधुरं राहिलं…वर्ल्ड कपमध्ये आजही होते तिची चर्चा

तिसरा सामना पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. तिसऱ्या सामन्यात पाऊस आला तेव्हा भारताच्या ७५ धावा होत्या, तर डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांना विजयासाठी ७६ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत सामना टाय झाल्याचे घोषित करण्यात आला. भारताने दुसरा सामना ६५ धावांनी जिंकून मालिका १-० ने आपल्या नावावर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here