कल्याणः करोनाचा संसर्ग झाल्यानं हतबल झालेल्या एका तरुणानं क्वारंटाइन सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणारा तरुण डोंबिवली येथे राहणारा आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Covid-19 patient sucide)

महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोव्हिड सेंटरमध्ये १७ जुलै रोजी त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला सेंटरमधील नवव्या मजल्यावर त्याला ठेवण्यात आलं होतं. अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून तो रुमचे दार उघडत नव्हता व उपचार घेण्यासही नकार देत होता.

वाचाः

सदर व्यक्तीची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आज अखेर मोठ्या प्रयत्नानी डॉक्टर व रुग्णालयातील कर्माचाऱ्यांनी दार उघडण्यास भाग पाडले. रुग्णाची मानसिक अवस्था लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला खालच्या मजल्यावर नेण्याची तयारी केली. खाली जात असताना तरुणानं पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. या सर्वप्रकारामुळं क्वारंटाइन सेंटरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here