मुंबईः महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांचा आकडा तीन लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. आज राज्यात तब्बल ९ हजार ५१८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं आज उच्चांक गाठला असल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. यासोबतच देशातील करोनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्यानं चिंता वाढली आहे. ()

वाचाः

राज्यात आज दिवसभरात करोना संसर्गाच्या ९५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५८ जणांना करोनाच्या संसर्गामुळं जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३. ८२ टक्के इतका असून एकूण करोना मृतांचा आकडा ११ हजार ८५४वर पोहोचला आहे. राज्यात एकूण ३ लाख १० हजार ४५५ रुग्ण करोनावर उपचार घेत असून १ लाख २८ हजार ७३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४५ हजार ८४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे.

वाचाः

राज्यात आज ३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १ लाख ६९ हजार ५५९ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ५४. ५२ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ चाचण्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ (१९. ८५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

करोना मृत्यूच्या एकूण संख्येत मुंबईनंतर चार आकडी मृत्यू संख्या गाठणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर ठरलं आहे. पुण्यात आज १ हजार ८२३ करोनाबळींची नोंद झाली आहे. तर आज ३ हजार ४४३ नवीन रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णसंख्या ६२ हजार ५९० इतकी झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here