क्षीरसागर यांचा २४ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आठ दिवसापासून शहरात चौकाचौकात शुभेच्छा फलक झळकले आहेत. शहरातील ताराराणी चौकासह अनेक मोक्याच्या चौकात सकाळी झळकलेल्या फलकावर थेट कुविख्यात गुंड अमोल भास्करचा फोटो दिसला. क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या या फोटोत या गुंडासोबत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो होते.

मुख्यमंत्र्यासोबत गुंडाचा फोटो पाहून शहरात एकच खळबळ उडाली. संतापाच्या भावना व्यक्त होऊ लागल्याने पोलिस आणि महापालिकेने हस्तक्षेप करत हे फलक उतरवले. सामाजिक कार्यकर्ते असे लिहून या गुंडाचे फोटो लावले गेले. पण शहरात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेमुळे वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच ते उतरविण्याची वेळ त्यांच्यावर आली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.