सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत तक चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळंद येथे मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी निघाले असता अक्कलकोट जवळील शिरवळ गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. इंडी गावातील प्रतिष्ठित असे कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. निसार मच्छीवाले अशी त्यांची इंडी गावात ओळख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांची नावे :-

१. चालक हैदरअली खुदबुददीन मुल्ला (वय ४० रा. इंडी, तालुका इंडी, जि. विजापूर)

२. आयेजा इमामसाब कडलासकर (वय दिड वर्ष )

३. सलमा खालीद लष्करी (वय ४८ रा. इंडी, जि. विजापूर)

मुख्यमंत्र्यासोबत कुख्यात गुंडाचा फोटो, कोल्हापुरात खळबळ, वाढदिवसापूर्वीच उतरवले फ्लेक्स!
जखमींची नावे :-

१. उमामा लष्करे (वय ३ वर्ष, रा. इंडी जि. बिजापूर, कर्नाटक)

२. बशीरा सलगरे (वय ३५, रा. इंडी जि. बिजापूर, कर्नाटक)

३. जुबेर लष्करे (वय २२ वर्ष, रा. इंडी, जि. बिजापूर कर्नाटक)

४. खालिद लष्करे (वय ५५, रा. इंडी जि. बिजापूर, कर्नाटक)

अक्कलकोटहून आळंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या स्टाईल घेऊन जाणाऱ्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात दोन पुरुषांचा व एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे. तर जखमींवर स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

वागदरीवरून स्टाईल घेऊन सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला आळंदकडे जाणाऱ्या एका अल्टो कारने समोरून जोरदार धडक दिली. अल्टो कारचा वेग खूप होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. रस्ता मोठा असताना देखील कार चालकाचा ताबा सुटला आणि सरळ कार ट्रकला धडकली. त्यात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस उप.अधीक्षक राजेंद्र गौर, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. अतिवेग व सलग ड्रायव्हिंग हेच अपघाताचे कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मेळघाटातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना, वर्गखोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here