किशनगंजः भारत- नेपाळमधील तणावाचा परिणाम (India Nepal Border Dispute) आता भारतीय सीमावर्ती भागातील नागरिकांवर होऊ लागला आहे. वास्तविक, बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर शनिवारी रात्री नेपाळ पोलिसांनी ( Firing) तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.

जखमी तरुणाचे नाव जितेंद्र कुमार सिंह असे आहे. जितेंद्र हा खानियाबाद पंचायतीच्या माफी टोला येथील रहिवासी आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र टेढागाछ इथे त्याला उपचारासाठी आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक चांगल्या उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात करण्यात आले. जखमी तरूण जितेंद्र कुमार सिंग याच्यावर आता पूर्णिया येथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

घटनेनंतर अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत: एसपी

किशनगंजमधील भारत-नेपाळ सीमेजवळ नेपाळ पोलिसांनी तीन भारतीयांवर गोळीबार केला. नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलिस आणि एसएसबी अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. या घटनेवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असं किशनगंजचे पोलीस अध्यक्ष कुमार आशिष यांनी सांगितलं.

भारत-नेपाळ सीमा पूर्णपणे सील

विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून भारत-नेपाळ सीमा पूर्णपणे सील झाली आहे. लोकांच्या येण्या-जाण्यावरही पूर्णपणे बंदी आहे. नेपाळ सरकारने भारत-नेपाळ सीमेवर अतिरिक्त सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. सीमेवरील मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त पायवाटांवरही कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सीमेवर नेपाळमध्ये नेपाळी सशस्त्र दलांनी छावण्या उभारल्या आहेत. तर भारताचे सीमेवर एसएसबीचे जवान आधीच तैनात आहेत. सीमेवर जागता पहारा ठेवला जात आहे.

नेपाळ पोलिसांचा गेल्या महिन्यातही गोळीबार
भारत-नेपाळमध्ये सीमेवरून वाद सुरू असताना बिहारच्या सीतामढीमध्ये नेपाळ पोलिसांनी गेल्या महिन्यात गोळीबार केला होता. सीमेवर नेपाळ पोलिसांकडून तुफान गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शेतात काम करणाऱ्या एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर आणखी दोन जण जखमी झाले होते. जखमींही प्रकृती चिंताजनक बनली होती. गेल्या महिन्यात १२ जूनला ही घटना घडली होती. या घटनेनंतर सीमेवर तणावाची स्थिती आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here