सिंधुदुर्गः गणेशोत्सवासाठी अवघा एक महिन्या शिल्लक असताना आतापासूनच मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येनं सिंधुदुर्गकडे रवाना झाले आहेत. यामुळं खारेपाटण चेकपोस्टवर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लाब रांगा लागल्या आहेत. ( )

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळं यंदा मात्र चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार असल्याचं टिपण जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, मुंबई, ठाण्यातील चाकरमान्यांनी आत्तापासूनच गाव गाठण्यासाठी तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसांत २ हजार चाकरमानी सिंधुदुर्गात जिल्हात दाखल झाले आहेत. परिणामी, इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक दाखल झाल्यानं खारेपाटाणे चेक पोस्टवर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वाचा:

मार्च महिन्यात राज्यात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर मुंबई, ठाणे शहरातील नागरिकांनी गावाकडे धाव घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. चाकरमान्यांचा ओघ सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई व राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची चेकपोस्टवर नोंद केली जात आहे.

केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित केला आहे. तसंच, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी व गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात असं नियम चाकरमान्यांना पाळावे लागणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here