मुंबई: चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी बीवायडी (BYD) ने अलीकडेच भारतात पहिली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च केली आहे. भारत जगातील चौथ्या क्रमांकाची कार बाजारपेठ आहे. तर देशात इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्स (Tata Motors) चे वर्चस्व आहे.

टाटांच्या वर्चस्वाला चिनी कंपनी आव्हान देऊ शकते, असे मानले जात होते. पण अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffet) यांनी या चिनी कंपनीला मोठा धक्का दिला आहे. ऑगस्टपासून बफे यांनी या कंपनीतील आपला हिस्सा पाच वेळा विकला आहे. यापूर्वी त्यांनी या कंपनीतील त्यांची गुंतवणूक १४ वर्षे कायम ठेवली होती. आता त्यांची BYD मधील हिस्सेदारी १५.९९ टक्क्यांवर आली आहे.

मोठ्या मनाचे टाटा! मेटा, ट्विटरनं नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; टाटांनी माणुसकी जपली
तीन वेळा विक्री
वॉरन बफे यांनी कंपनी बर्कशायर हॅथवेने गेल्या आठवड्यात BYD चे ३२ लाख शेअर्स विकले. ही चीनी वाहन कंपनी हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध आहे. बर्कशायर हॅथवेने या चिनी कंपनीचे शेअर्स नोव्हेंबरमध्ये तीन वेळा विकले आहेत. कंपनीने ऑगस्टमध्ये पहिल्यांदा शेअर्स विकले तेव्हा कंपनीकडे २२.५ कोटी शेअर्स होते. बफे यांच्या कंपनीने २००८ मध्ये BYD चे शेअर्स प्रती शेअर १.०२ डाॅलरला विकत घेतले आणि एकूण २३ कोटी डाॅलरची गुंतवणूक केली. त्यानंतर जागतिक आर्थिक संकटामुळे कंपनीचे शेअर्स विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले होते.

गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान; टाटा समूहाचा हा शेअर १०० रुपयांच्या खाली, किंमत ६६% घसरली
शेअर्समध्ये तेजी
नीचांकी पातळीला आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. वर्ष २०२० मध्ये BYD शेअर्स ४३७ टक्के वाढले. एलन मस्क यांच्या टेस्लाला मागे टाकून ही कंपनी चीनमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ईव्ही ब्रँड बनली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये १०३,१५७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली तर टेस्लाने ७१,७०४ युनिट्सची विक्री केली. BYD च्या शेअर्सने जूनमध्ये ४२ डाॅलरचा विक्रमी उच्चांक गाठला. ही शेअर्सची किंमत १४ वर्षांपूर्वीच्या ४१ पट जास्त आहे. यामुळेच बर्कशायर त्यावर प्रचंड नफा कमावत आहेत. गेल्या चार महिन्यांत त्यांनी BYD चे ४.९ कोटी शेअर्स विकले आहेत.

टाटा समूहाची मोठी तयारी… पुन्हा एकदा सौंदर्य आणि पर्सनल केअर मार्केटमध्ये उतरणार, ही आहे योजना
Atto ४ लाँच
BYD ने गेल्या महिन्यात भारतात आपली Atto ३ इलेक्ट्रिक SUV लाँच केली. कंपनी जगातील अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक कार आणि प्लग-इन इलेक्ट्रिक हायब्रीड्स विकत आहे. यामध्ये नॉर्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, ब्राझील, कोस्टा रिका आणि कोलंबिया यांचा समावेश आहे. कंपनीने २००७ मध्ये भारतात प्रवेश केला. कंपनीचा प्लांट चेन्नईजवळ आहे. सुरुवातीला ते मोबाईल फोनसाठी बॅटरी आणि पार्ट तयार करायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here