म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘दूध दरासाठी भाजपचे मतलबी आंदोलन सुरू आहे. दूध उत्पादकांचा कळवळा असेल तर केंद्र सरकारकडून सुरू असलेली दूध पावडरीची आयात बंद करा. केवळ राज्य सरकारच्या मागे लागून प्रश्न सुटणार नाही. हिंमत असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दूध पावडरीची आयात थांबवा,’ असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रमुख यांनी भाजपला दिले आहे.

दूध दराच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आमने-सामने आले आहेत. शेट्टी यांच्या दूध दर आंदोलनापूर्वीच सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचे भाजपने जाहीर करताच शेट्टी यांनी भाजपचे आंदोलन मतलबी असल्याचे म्हंटले आहे. याबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले, ‘लॉकडाउनमुळे दुधाची मागणी ४० टक्क्यांनी कमी झाली. देशात दूध पावडर आणि बटरचे साठे पडून आहेत. केंद्र सरकारे तातडीने दूध पावडरीची आयात बंद करणे गरजेचे आहे. असं ते म्हणाले.

वाचाः

भाजपने आंदोलन करण्यापेक्षा केंद्राकडे पाठपुरावा करून दूध पावडरीची आयात बंद करावी. केवळ राज्य सरकारच्या मागे लागून प्रश्न सुटणार नाही. भाजपचे आंदोलन केवळ राज्य सरकारच्या विरोधात आहे. आमचे आंदोलन राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे.’ साखर उद्योगाच्या समस्यांबाबत दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळावरही शेट्टी यांनी टीका केली. ‘शेतक-यांची एफआरपी थकवणारे कारखानदार शिष्टमंडळात होते. भाजपमधील चांगल्या कारखानदारांनाही ते घेऊन जाऊ शकले असते. त्यांच्या हेतूबद्दलच शंका आहेत,’ असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भाजपाचे १ ऑगस्ट रोजी दूध दरवाढीसाठी आंदोलन होणार आहे. दूध संघाना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची मुख्य मागणी असून या आंदोलनात रासप, रयत क्रांती, आरपीआय या संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here