मुंबई: वित्तीय सेवा उद्योगाशी संबंधित एक छोटी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देणार आहे. ही कंपनी नायसा सिक्युरिटीज लिमिटेड आहे. शेअर बाजारातील स्मॉल-कॅप कंपनी आपल्या भागधारकांना १५:१० च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक १० शेअर्समागे १५ बोनस शेअर्स देईल. कंपनी शेअर बाजारासाठी उत्पादने आणि सेवा पुरवते. याशिवाय नायसा सिक्युरिटीज आर्थिक सल्लागार सेवा देखील प्रदान करते.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात आज आनंदाचे वातावरण, सेन्सेक्स-निफ्टीची तेजीत सुरुवात
बोनस शेअर इश्यू मंजूर
नायसा सिक्युरिटीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झाली आहे, ज्यामध्ये १५:१० च्या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे सांगितले आहे. नायसा सिक्युरिटीजचे मार्केट कॅप ७६.६६ कोटी रुपये असून कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी ४६.९२ टक्के आहे. तर कंपनीच्या समभागांची ५२ आठवड्यांची उच्च पातळी १७६.४५ रुपये आहे.

पैसे तयार ठेवा! आणखी २ IPO ना सेबीचा हिरवा कंदील, घ्या जाणून संपूर्ण तपशील
नायसा सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत ५७८ टक्के वाढ झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (बीएसई) ६ जानेवारी २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २५.९९ रुपये होते. तर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर १७६.४५ रुपयांवर बंद झाले. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात, नायसा सिक्युरिटीजचे शेअर्स ५५४% पेक्षा जास्त वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ३०% वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना बंपर नफा! टेक कंपनीचे शेअर्स ३२% प्रीमियमसह बाजारात दाखल
गुरुवारी बाजाराची सुरुवात
गुरुवारी सकाळी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकाने तेजीत व्यवहाराची सुरुवात केली. सोल, टोकियो आणि हाँगकाँगमधील बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर शांघाय लाल रंगात बंद झाला. याशिवाय वॉल स्ट्रीट निर्देशांकही लाल चिन्हात बंद झाला.

रुपया मजबूत झाला
गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २६ पैशांनी वाढून ८१.६७ वर बंद झाला. आंतरबँक परकीय चलनात, देशांतर्गत युनिट डॉलरच्या तुलनेत ८१.७२ वर उघडले आणि मागील बंदच्या तुलनेत २६ पैशांनी वाढ नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here