नवी दिल्ली: खाण क्षेत्रातील प्रमुख वेदांताने चालू आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर १७.५० रुपये प्रति इक्विटी शेअरचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचा चालू आर्थिक वर्षातील हा तिसरा लाभांश आहे. त्यानुसार, एकूण देय रक्कम ६,५०५ कोटी रुपये येते, अशी माहिती कंपनीने मंगळवारी दिली. त्यामुळे गुंतवणूकदारांची पुन्हा बक्कळ कमाई होणार आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचे एकूण कर्ज ५८,५९७ कोटी रुपये होते.

वेदांतने भागधारकांना जाहीर केलेला लाभांश हा कोणत्याही बँकेकडून मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे. वेदांताने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, “कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवारी एका ठरावाद्वारे १७.५० रुपये प्रति इक्विटी शेअरचा तिसरा अंतरिम लाभांश म्हणजेच २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ६,५०५ कोटी रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यावर १,७५० टक्के लाभांश मंजूर केला.”

कमाईची संधी! १३ शेअर्स तुम्हाला करतील ‘मालामाल’, तुमच्याकडे आहेत का चेक करा लिस्ट
पहिल्या दोन वेळा लाभांश किती होता
कंपनीने सांगितले की, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात ३० नोव्हेंबर आहे. अंतरिम लाभांश कायद्यानुसार विहित केलेल्या कालमर्यादेत दिला जाईल. वेदांताने यापूर्वी ३१.५ रुपयांचा पहिला अंतरिम लाभांश आणि प्रति इक्विटी शेअर १९.५० रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला होता. वेदांत लिमिटेड तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, ॲल्युमिनियम, लोह धातू, पोलाद आणि उर्जा व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. वेदांत रिसोर्सेस, मुख्यालय लंडनमध्ये असून ती वेदांत लिमिटेडची मूळ कंपनी आहे आणि त्यात ६९.७ टक्के हिस्सा आहे. अनिल अग्रवाल यांचे कौटुंबिक गुंतवणूक वाहन वॉलकनची वेदांत रिसोर्सेसमध्ये १००% मालकी आहे.

शेअरधारकांचे पैसे डबल! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, शेअर्सने ६ महिन्यांत दिलाय मजबूत परतावा
अनिल अग्रवाल स्टील व्यवसायातून बाहेर पडत आहेत
अलीकडेच अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूहाने स्टील कंपनी इलेक्ट्रोस्टील स्टील्स लिमिटेड विकण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त अशी बातमी आली होती. समूहाने ४ वर्षांपूर्वी ही कंपनी विकत घेतली होती. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात, सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की समूह आता त्याच्या मूळ व्यवसाय खाणकाम आणि औद्योगिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे आणि ताळेबंदात कर्ज कमी करू इच्छित आहे. गुंतवणूकदारांनी लक्षात घ्या की मार्च अखेरीस, वेदांत समूहावर ११.७ अब्ज डॉलरचे कर्ज होते.

गुंतवणूकदारांची लॉटरी! तुफान कमाई करून देणारी कंपनी देणार १५ बोनस शेअर्स, वर्षभरात दिलाय छप्परफाड रिटर्न
दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात घट
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये वेदांताचा एकत्रित निव्वळ नफा ६०.८ टक्क्यांनी घसरून १,८८०८ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४,६१५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तसेच जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान कंपनीचा खर्च ३३,२२१ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत २३,१७१ कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत एकात्मिक उत्पन्न वाढून ३७,३५१ कोटी रुपये झाले. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत त्याचे एकात्मिक उत्पन्न ३१,०७४ कोटी रुपये होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here