सचिन पायलट यांनी भाजपचा पाहुणचार सोडून द्यावा आणि सर्व मुद्द्यांवर पक्षाशी चर्चा करावी, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. पक्षाच्या नाराज आमदारांनी माध्यमांद्वारे संवाद करू नये. तुम्ही लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहात. आम्ही ते स्वीकारतो. परंतु पक्षातील वाद हा पक्षातच चर्चेद्वारे सोडवला पाहिजे. हा वाद माध्यमांमधून वक्तव्य करून सुटणार नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पाहुणचार नाकारायला हवा. हरयाणातील भाजप सरकार काँग्रेस आमदारांचे ज्या प्रकारे आदरातिथ्य करत आहे ते धक्कादायक आहे. भाजपचे समर्थक ज्या प्रकारे काँग्रेसच्या नाराज आमदारांची बाजू घेत आहेत त्यामागे कट असल्याचा संशय योतोय, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटचा आहे. विधिमंडळ पक्षाच्या मागणीवर हे ठरवलं जातं. राज्यातील भाजप नेत्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी करू नये, असं भाजप नेतृत्वाकडून सांगण्यात येतंय. यामुळे भाजपकडे बहुमत नाहीए हे स्पष्ट होतं, असं सुरजेवाला म्हणाले.
राजस्थानमध्ये काँग्रेसकडे बहुमत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनीही हे कबुल केलं आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आलेली नाही. तसंच काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही, असंही भाजप नेते बोलत होते. यावरून भाजपचे षड्यंत्र समोर आले आहे, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times