टाटा नेहमीच त्यांच्या एअर इंडिया क्रू मेंबर्सच्या लूक आणि पेहरावाबद्दल जागरूक असतो. एवढेच नाही तर जेआरडी टाटा जेव्हा विमानसेवा चालवायचे तेव्हाही ते क्रू मेंबर्सच्या पहरव्याची विशेष काळजी घ्यायचे.
जेआरडी टाटांच्या काळात क्रू मेंबर्सचा पेहरावा
जेआरडी टाटा वर्ष १९२९ मध्ये पायलटचा परवाना मिळवणारे देशातील पहिले व्यक्ती होते. त्यानंतर त्यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स सुरू केली. या वेळी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सच्या ड्रेसची विशेष काळजी घेण्यात आली. विशेष म्हणजे त्या काळातही टाटा एअरलाइन्सचे क्रू मेंबर्स पाश्चिमात्य कपडे घालायचे. एअर होस्टेस ब्लेझर आणि स्कर्ट घालायच्या. लक्षात घ्या की त्यावेळी बहुतेक एअर होस्टेस एकतर युरोपियन वंशाच्या किंवा अँग्लो-इंडियन होत्या.
त्यांना त्यांच्या मेक-अप आणि कपड्यांबाबत काही स्वातंत्र्य असावे, असे क्रू मेंबर्सच्या पेहराव आणि ग्रूमिंगबाबत जेआरडी टाटा यांचे मत होते. त्यांच्या पेहरावातून त्याचे व्यक्तिमत्त्व दिसून आले पाहिजे, असे ते म्हणायचे. क्रू मेंबर्सने गोंडस आणि हास्यास्पद यांच्यातील रेषा कोठे काढायची हे त्यांच्या ग्रूमिंगच्या बाबतीत लक्षात ठेवले पाहिजे.
साडी आणि घागरामध्ये एअर होस्टेस
वेळ बदलत गेल्यानंतर १९५३ मध्ये जेव्हा एअरलाइन सरकारकडे परतली तेव्हा एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा ड्रेस पुन्हा बदलण्यात आला. एअर होस्टेस स्कर्ट ऐवजी साड्या आणि घागरा-चोली घालू लागल्या. भारतीय परंपरेची झलक दिसावी, यादृष्टीने फ्लाइट अटेंडंटची ड्रेसिंग ठेवण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू साडी आणि वेस्टर्न दोन्हीचा पर्याय दिला जाऊ लागला. पण केवळ कपडेच नाही तर एअर होस्टेसला तिच्या मेकअपची, हेअरस्टाइलची विशेष काळजी घ्यावी लागते.
एअर इंडियाची नवी लिस्ट
अनेक वर्षानंतर एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांकडे परतली आहे. आणि आता पुन्हा क्रू मेंबर्सच्या ग्रूमिंगमध्ये बदल केले जात आहेत. एअर इंडियाने विमानातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
- कमी केस किंवा टक्कल पडलेल्या पुरुष केबिन क्रूला मुंडण करणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर एअर होस्टेसना लोम्बकळते कानातले न घालण्यास सांगण्यात आले आहे
- टिकली ०.५ सेमी पेक्षा जास्त मोठी नसावी.
- डिझाईन नसलेली बांगडी घालणे भाग आहे.
- महिला केबिन क्रूला आयशॅडो, लिपस्टिक, नेलपेंट आणि हेअर शेड कार्डचे पालन करावे लागेल.
- त्यांना मोत्याचे कानातले घालण्याची परवानगी नाही.
- क्रू मेंबर्स विनाडिझाईन केलेले सोन्याचे किंवा डायमंडचे कानातले घालू शकतात.