heart attack, लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांत नवविवाहितेचं कुंकू पुसलं; तरुणाने गमावले प्राण – young man passed away due to heart attack in just 6 days after marriage at yelevasti in baramati taluka
बारामती : विवाह झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या तरुणाचे लग्नगाठ बांधल्यानंतर अवघ्या सहाव्या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना बारामती तालुक्यातील येळेवस्ती येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. सदर घटनेने येळेवस्तीसह संपूर्ण माळेगाव येथे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे यांचे तृतीय चिरंजीव सचिन ऊर्फ बबलू अनिल येळे (वय २७, रा.येळेवस्ती, माळेगाव) यांचा विवाह हर्षदा संतोबा बोरकर (रा.पिपळा जि.परभणी) हिच्याशी १९ नोव्हेंबर रोजी शारदानगर येथील अनुज गार्डन येथे अतिशय थाटात साजरा झाला. घराच्या अंगणात जेवताना बिबट्याचा हल्ला, महिलेला फरफटत जंगलात नेलं अन्…
या विवाहानंतर येळे कुंटुबाने परंपरेनुसार देवदर्शन केलं. दोघांनीही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवली. मात्र गुरुवारी पहाटे सचिनला अस्वस्थ वाटू लागल्याने नववधू हर्षदाने कुटुंबाला सांगितले. मात्र दुर्दैवाने सचिन याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सचिनने प्राण सोडल्याचं कळताच येळे कुटुंबाने मोठा आक्रोश केला. पाहता पाहता वस्तीमधील नागरिक जमा झाले आणि सगळेच धाय मोकलून रडू लागले.
दरम्यान, ज्या घरासमोरील मंडपात आनंद साजरा केला, त्याच घरासमोर अजूनही असलेल्या मंडपात सचिनचा मृतदेह ठेवण्याची दुर्दैवी वेळ येळे कुटुबांवर आली होती. अखेर अतिशय शोकाकुल वातावरणात सचिन याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान सचिन येळे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.