मुंबईः मंदिर बांधून व देवाची उपासना करुन करोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील करोना जाऊ दे असे साकडे का घातले? त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी केंद्र सरकारकडून तारीख निश्चित केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यावरुन शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून भाजपनं त्यांना घेरलं आहे. ( on )

वाचाः

आम्हाला वाटते की करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल, असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौ-यादरम्यान लगावला होता. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत असल्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे, म्हणूनच या संकटाच्या परिस्थितीत मोदी यांनी देशासाठी गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेजचा तात्पुरता दिलासा जनतेला दिल्यानंतर २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज मधून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला चालना दिली व देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी भर दिला, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

वाचाः

पंतप्रधान मोदी करोनाच्या परिस्थितीत पूर्ण संवेदनशील आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून येथे करोना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या आवश्यकता आहेत, पण दुर्देवानं त्या होत नाही, म्हणून रोज करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या उलटपक्षी विरोधी पक्ष नेते व भाजप जनतेमध्ये जाऊन व सेवाकार्य करुन करोनाच्या बाबतीत आपली बांधिलकी सांभाळत आहे, याचेपण भान सर्वांना असले पाहिजे असेही दरेकर यांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here