कोल्हापूर : कोल्हापूरमधील लोकांचे फुटबॉल खेळावर असलेले जीवापाड प्रेम काही सांगायची गरज नाही. इथल्या प्रत्येक पेठापेठांमध्ये फुटबॉल बघायला मिळतो. आता हेच कोल्हापूरकर जेव्हा कतारमध्ये असतील आणि त्याच कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप होत असेल तर यापेक्षा मोठी पर्वणी त्यांच्यासाठी असूच शकत नाही. कोल्हापूरातील अनेकजण सध्या कतारमध्ये आहेत. त्यातील अनेकजण सध्या स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉल वर्ल्डकप पाहत आहेत.

अशाच एका कोल्हापूरच्या ७ वर्षीय रिहम झाकिर मुल्ला नावाच्या मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने स्वतःच्या हाताने बनवलेले पोस्टर स्टेडियममध्ये नेले असून फुटबॉलसाठी संपूर्ण कोल्हापूरकडून प्रेम व्यक्त केले आहे. तर कोल्हापुरातील स्थानिक मंडळ असणारे पाटाकडील तालीम मंडळाचा झेंडा अमेय देसाई यांनी फडकवला आहे. यामुळे कोल्हापूरकरांचे फुटबॉलविषयी असलेले प्रेम जगाच्या पाठीवर देखील व्यक्त होत आहे.

लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांत नवविवाहितेचं कुंकू पुसलं; हृदयविकाराच्या धक्क्याने पतीने गमावले प्राण
फुटबॉलवरील प्रेम अनेक कोल्हापूरकरांना थेट कतारला घेऊन चालले आहे. फुटबॉलची पंढरी असलेले कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अनेकजण फुटबॉल विश्‍वचषकाचे साक्षीदार होत आहेत. कोल्हापुरातील अनेक नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त कतारमध्ये असून यंदा फिफा वर्ल्ड कप हा कतारमध्ये होत असल्याने येथील कोल्हापूरकरांना ही एक पर्वणी ठरली आहे. येथील प्रत्येक कोल्हापूरकर मैदानावर हजेरी लावत असून यावेळी देशाचा तिरंगा, स्थानिक मंडळाचा झेंडा फडकवण्यात आला.

कोल्हापुरातील स्थानिक मंडळ असणारे पाटाकडील तालीम मंडळाचा झेंडा अमेय देसाई यांनी कतार मध्ये फडकवला आहे. यावेळी भरतेश कळंत्रे, प्रशांत कळंत्रे, प्रीतम मेक्कळकी, सौजन्य रोटे, शुभम रोटे, इंद्रजित रोटे, सुयश चौगुले, गौरी कळंत्रे, हेमलता दुगे, सुनित कळंत्रे, अनुज बोरगावे यांनी मैदानावर हजेरी लावली.

बेळगाव कारवार निपाणी देणार असाल तर जतच्या गावांची चर्चा करु, पवारांचं बोम्मईंना रोखठोक उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here