मुंबईः करोना संसर्गाला रोखण्यात आघाडीवर असतानाच आज पुन्हा मुंबईच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे आहे. दिवसभरात मुंबई महानगर प्रदेशात १ हजार ०४६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण करोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. ()

सध्या मुंबई महानगरपालिकेनं राबवलेला मुंबई पॅटर्नची जगभरात चर्चा आहे. महापालिकेनं राबवलेल्या उपाययोजनांमुळं करोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यात यश आलं आहे. मात्र, असं असतानाच मुंबईतील आजची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. आज मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांची संख्या ५ हजार ७११ इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आणखी वाढून सरासरी ५५ दिवसांवर पोहोचला. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन १.२६ टक्के झाला आहे.

समाधानकारक बाब म्हणजे, आज मुंबईतील १ हजार १९३ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळं एकूण ७१ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्के आहे. तर एकूण २३ हजार ८२८ रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

पुणे शहरात मृत्युसंख्या हजारपार
पुणे शहरातील करोनारुग्णांच्या मृत्युसंख्येने रविवारी एक हजाराचा टप्पा पार केला. पुणे महापालिका हद्दीत २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, पुणे शहरातील एकूण मृत्युसंख्या १ हजार १९ इतकी आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत आजपर्यंत एकूण ५ हजार ७१४ मृत्यूंची नोंद झाली असून, मुंबईनंतर चार अंकी आकडा गाठणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here