शहरात ३४ गावे नव्याने समाविष्ट झाल्याने पुण्याच्या पाण्याची गरज वाढण्याबरोबर शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पुण्याची पाण्याची गरज कमी होण्याऐवजी वाढत असल्याने पिण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी कधी सोडायचे? किती प्रमाणात सोडणार याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्सुकता आहे.
Home Maharashtra khadakwasla dam news, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खडकवासलाच्या पाण्याबाबत उद्या निर्णय...
khadakwasla dam news, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खडकवासलाच्या पाण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता – important news for farmers in pune district a decision is likely to be taken tomorrow regarding khadakwasla dam water
पुणे : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. शेतीसाठी येत्या २५ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.