मुंबई : देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी पेटीएम (Paytm) च्या नावावर एक नको असलेला विक्रम झाला आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लि.च्या शेअरची किंमत ७५ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. गेल्या दशकातील जगातील कोणत्याही मोठ्या आयपीओ (IPO) ची ही पहिल्या वर्षातील सर्वात वाईट कामगिरी आहे.

शेअर्समध्ये सातत्याने घसरण
कंपनीने गेल्या वर्षी देशातील सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणला होता. पण लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. हा शेअर्स कधीही आयपीओ किमतीच्या जवळपास पोहोचू शकला नाही. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये स्पेनच्या बँकिया एसए नंतरची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.आयपीओनंतर पहिल्या वर्षी स्पॅनिश कंपनीचा शेअर ८२ टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांची चांदीच चांदी… वेदांताचा तिसरा लाभांश जाहीर, जाणून घ्या प्रति इक्विटी शेअर किती मिळणार
५२ आठवड्यांतील नीचांक
पेटीएम (Paytm) ने गेल्या वर्षी आयपीओद्वारे १८,३०० कोटी रुपये उभारले. शेअर्सची किंमत २,१५० रुपये होती. पण गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून शेअर्स सातत्याने घसरत आहे. आज तो ४४१.०५ रुपयांवर बंद झाला. ही ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. या महिन्यात शेअर्सची किंमत ३० टक्क्यांनी घसरली आहे. गुंतवणूकदारांचा पेटीएमवरील विश्वास उडाला आहे आणि त्यांना वाटते की कंपनी नफा कमावण्याची शक्यता नाही. यामुळेच कंपनीचे शेअर्स घसरत आहेत.

शेअर बाजारात जोरदार उत्साह; सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रम, निफ्टी ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर
या कारणामुळे घसरण
गेल्या आठवड्यात जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनने लॉक इन कालावधी संपल्यानंतर पेटीएमचे शेअर्स विकले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जगभरात टेक शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. कारण गुंतवणूकदार तोट्यात चाललेल्या कंपन्यांपासून दूर जाऊ लागले आहेत. पेटीएमच्या आयपीओमध्ये लहान गुंतवणूकदारांनीही सहभाग घेतला, पण त्यांची निराशा झाली. कंपनीचा शेअर्स त्याच्या इश्यू किमतीपेक्षा कधीही वाढू शकला नाही.

एका वर्षात गुंतवणूकदार कंगाल! एकट्या Paytm ने इतके कोटी बुडवले, IPO आणलेल्या आयटी कंपन्यांनी केली निराशा
चांगले व्यवसाय मॉडेल पण…
पेटीएममध्ये ब्लॅकरॉक इंक (BlackRock Inc) आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डानेही सहभाग घेतला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की २००६-०८ मध्ये गुंतवणूकदारांनी बांधकाम कंपन्या आणि भांडवली वस्तूंच्या कंपन्यांवर उत्साह दाखवला होता. २०१३-१४ हा मिडकॅप कंपन्यांचा काळ होता. २०१७-१९ मध्ये गुंतवणूकदारांचा कल नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे होता. तर २०२०-२२ मध्ये लोक टेक कंपन्यांबद्दल उत्साही होते. यापैकी काही कंपन्यांचे चांगले व्यवसाय मॉडेल आहेत. परंतु हे व्यवसाय अजूनही विकसित होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here