मुंबई: आशियाई बाजारातील घसरणीनंतरही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात संमिश्र व्यवहार पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११६ च्या वाढीसह ६२,३८८ वर उघडला तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी ४४ अंकांनी वाढून १८,५२८ वर खुला झाला. मात्र व्यवहाराची सुरुवात हिरव्या केल्यानंतर लगेचच बाजारात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स ११२ अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी २९ अंकांनी घसरून व्यवहार करत आहे.

Paytm ची घसरण थांबेना! कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी घासारण, गुंतवणूकदारांचे करोडो स्वाहा!
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
दरम्यान, बाजारात बँकिंग, इन्फ्रा आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत, तर आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी या क्षेत्रांचे शेअर्सनी घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली. तसेच निफ्टीच्या ५० समभागांवर नजर टाकली तर २१ समभाग तेजीसह व्यवहार करत असून २९ समभाग घसरले आहेत. तर सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी ११ समभागांत तेजी दिसून आली तर १९ समभाग घसरणीसह उघडले आहेत.

गुरुवारी बाजाराची ऐतिहासिक उडी
गुरुवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. या तेजीचा फायदा देत बीएसईवरील ३० शेअर्सच्या सेन्सेक्सने इतिहास घडवला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सने सर्व जुने रेकॉर्ड तोडले आणि ६२,४०५ अंकांवर पोहोचला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. मात्र, व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ७६२.१० अंकांनी किंवा १.२४ टक्क्यांनी वाढून ६२,२७२.६८ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांची चांदीच चांदी… वेदांताचा तिसरा लाभांश जाहीर, जाणून घ्या प्रति इक्विटी शेअर किती मिळणार
कोठे तेजी, कोठे घसरण
शुक्रवारी एनएसई निफ्टी पॉवरग्रिडमध्ये १.४५ टक्क्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे बीपीसीएल, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि हिंदाल्को यांचे समभागही लाल रंगात व्यवहार करत होते.

याशिवाय लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), एचडीएफसी (एचडीएफसी), रिलायन्स इंडस्ट्रीज (रिलायन्स इंडस्ट्रीज), बजाज ऑटो (बजाज ऑटो) आणि ॲक्सिस बँक शेअर्स निफ्टीवर हिरव्या चिन्हासह व्यवहार करत होते.

गुंतवणूकदारांची लॉटरी! तुफान कमाई करून देणारी कंपनी देणार १५ बोनस शेअर्स, वर्षभरात दिलाय छप्परफाड रिटर्न
टोकियोच्या शेअर बाजारात घसरण
थँक्सगिव्हिंगच्या निमित्त अमेरिकन बाजारात सुट्टी असल्याने गुंतवणूकदार नवीन बातम्यांच्या प्रतीक्षेत असताना शुक्रवारी टोकियोच्या शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बेंचमार्क निक्केई निर्देशांक २२५ जवळजवळ सपाट उघडला आणि सुरुवातीच्या व्यापारात ८१.६० अंक किंवा ०.२९ टक्के घसरून २८,३०१.४९ अंकांवर उघडला.

भारतीय रुपया घसरला
शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया थोडा कमजोर होऊन ८१.६७ वर उघडला. तर मागील सत्रात भारतीय चलन ८१.६२ च्या पातळीवर बंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here