Pune Crime News Today : शिक्षणांचं माहेरघर असणारं पुणे आता गुन्ह्यांचं माहेरघर झाल्याचं चित्र आहे. इथे वारंवार गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत असताना आता पुन्हा एकदा भयंकर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील माजी सरपंचाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.

 

pune rape case
पुणे : पुरंदर तालुक्यातील माजी सरपंच संतोष नाझिरकर याने एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीने आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना आपल्या आई दिली आणि लोकेशन पाठवलं आणि सतर्क होत आई तत्काळ पोलीसांना माहिती घटनास्थळी जाऊन पोलिसानी संतोष नाझिरकरला अटक केली.

या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणी माजी सरपंच संतोष नाझिरकर (वय ४० रा. पुरंदर तालुका) या आरोपीला अटक केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाझिरकर पीडित अल्पवयीन तरुणी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती.

आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्रींची बिनविरोध निवड, गावकऱ्यांनी दिली नवी जबाबदारी
चॅटिंग करत दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली. नाझिरकर याने बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असं सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज इथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले. आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्काराचे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानोबाच्या नावाचं चांगभलं! हातात काठ्या घेत थेट देव-दानवांचे युद्ध, पुण्यातील यात्रेचा थरारक VIDEO

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here