नवी दिल्ली: नशामुक्ती केंद्रातून परतलेल्या तरुणानं संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची घटना नवी दिल्लीत मंगळवारी घडली. काही महिन्यांपासून नशामुक्ती केंद्रात असलेला २५ वर्षांचा केशव घरी परतला. काही कारणावरून त्याचा कुटुंबीयांशी वाद झाला. यानंतर केशवनं आई, वडील, लहान बहिण आणि आजीची चाकूनं भोसकून हत्या केली.

हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस रात्री साडे दहा वाजता घटनास्थळी पोहोचले. आरोपीनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आलं. आरोपीनं धारदार शस्त्राचा वापर करून कुटुंबीयांचा गळा कापला आणि त्यांच्यावर अनेकदा वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केशवविरोधात कलम ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जंगलात शरीर संबंध ठेवायला लावले, मग फेविक्वीक टाकून संपवले; आता मांत्रिक पोलिसांना म्हणतो…
केशवचं कुटुंब एका इमारतीत दुसऱ्या इमारतीत राहायचं. याच इमारतीत केशवचे इतर नातेवाईकदेखील राहतात. केशवचा चुलत भाऊ कुलदीप दुसऱ्या मजल्यावरील आक्रोश ऐकला आणि पोलिसांना फोन केला. वाचवा, वाचवा असं म्हणत केशवची बहिण उर्वशीनं आक्रोश केला. यानंतर कुलदीपनं पालम पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांना घटनास्थळी चार मृतदेह आढळले. केशवनं पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. केशवकडे स्थिर नोकरी नव्हती. त्यामुळे कुटुंबियांचे केशवशी वाद घालायचे. हत्येवेळी केशव नशेच्या अमलाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
६७ वर्षीय बिझनेसमॅनचं अफेअर; शरीर संबंध ठेवताना अचानक मृत्यू; पुढे विचित्र प्रकार घडला
केशव काही महिने नशामुक्ती केंद्रात होता. मात्र त्याच्या आईनं त्याला परत आणलं. आईनं प्रेमापोटी केशवला घरी परत आणलं होतं. मात्र त्याची अमली पदार्थांची सवय काही सुटली नव्हती. तो अनेकदा हेरॉईन आणि गांजाचं सेवन करायचा, असं कुलदीपनं सांगितलं. तो एका ठिकाणी नोकरीला लागला होता. हत्येच्या १० दिवस आधीपर्यंत तो कामाला जात होता, अशी माहिती त्यानं दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here