वॉशिंग्टन: मत्सर, रागाच्या भरात एखादी व्यक्ती काय करून जाईल ते सांगता येत नाही. काहींना रागावर ताबा ठेवणं जमतं. मात्र काही जण संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचलतात. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अशीच एक घटना घडली आहे. प्रियकराचं घर पेटवणाऱ्या प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षांची सेनाईडा मेरी सोटो मध्यरात्री २ च्या सुमारास प्रियकराच्या घरात शिरली. तिनं त्याच्या घरातील काही वस्तू चोरल्या. त्याच्या घराला आग लावली. बेक्सार पोलिसांनी याबद्दलची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. चोरी आणि आग लावल्याप्रकरणी सेनाईडाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पोस्टच्या माध्यमातून दिली.
जंगलात शरीर संबंध ठेवायला लावले, मग फेविक्वीक टाकून संपवले; आता मांत्रिक पोलिसांना म्हणतो…
सेनाईडा सोटोनं तिच्या प्रियकराशी फेस टाईमच्या माध्यमातून संवाद साधला. हा फोन एका महिलेनं उचलला. प्रियकराला कॉल केल्यावर दुसऱ्या महिलेचा आवाज ऐकू आल्यानं सोटो संतापली. त्यामुळे तिचा जळफळाट झाला. मत्सरापोटी तिनं प्रियकराच्या लिव्हिंग रुममधील सोफा जाळला. त्यानंतर संपूर्ण घरात आग पसरली. विशेष म्हणजे ज्या महिलेचा आवाज ऐकून सोटोनं प्रियकराचं घर पेटवून दिलं, ती प्रियकराची नातेवाईक असल्याचं नंतर उघडकीस आलं.
मला माफ करा! पत्नीची गयावया, पण अचानक आवाज थांबला; २६ दिवसांपूर्वी झाला होता लग्न सोहळा
सोटोनं प्रियकराच्या घरातील सोफा पेटवला. हळूहळू आग घरात पसरली. घर जळू लागलं. यामुळे जवळपास ५० हजार डॉलरचं (४० लाख रुपयांहून जास्त) नुकसान झालं. सोटोनं फेसटाईम करून प्रियकराशी संपर्क केला आणि त्याला जळणाऱ्या सोफ्याचा फोटो पाठवला. तुझ्या घरातील वस्तू व्यवस्थित असाव्यात अशी अपेक्षा करते असं म्हणत सोटोनं फोन कट केला. पोलिसांनी सोटोला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here