महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ९५१८ नवीन रुग्ण आढळून आलेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत कोरोनाने २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्याने विषाणूने आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण ११,८५४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील परिस्थिती स्थिर
दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२११ नवीन रुग्ण आढळून आलेत. अशा प्रकारे, दिल्लीमधील करोना रुग्णांची एकूण संख्या ही वाढून १२२७९३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत ३६२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत एका दिवसात १८६० रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण १०३१३४ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिल्लीत सध्या कोरोनाच्या ६०३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. होम क्वारंटाइनमध्ये ८८१९ रूग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ५७६२ RTPCR चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १४४४४ अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशात २२५० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. लखनौमध्ये सर्वाधिक कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. यूपीच्या राजधानीत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लखनौमध्ये रविवारी ३९२ नवीन रुग्ण आढळले. राज्यात गेल्या २४ तासांत २२५० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या १८,२५६ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २९८४५ करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times