बुधवारी सकाळी केशव उशिरा उठला. त्यामुळे वडील जवळपास २० मिनिटं त्याला ओरडले. तुझ्याकडे नोकरी नाही. कुटुंबावर ओझं आहेस, अशा शब्दांत वडिलांनी केशवची कानउघाडणी केली. यामुळे केशव नाराज झाला आणि घरातून बाहेर निघून गेला. पोलीस चौकशीत केशव अतिशय थंडपणे उत्तरं देत आहे. आपल्याला कृत्याबद्दल कोणताच पश्चाताप नाही. यामध्ये चूक कुटुंबाचीच असल्याचं केशवनं पोलिसांना सांगितलं.
कुटुंबाला संपवायचं केशवनं मनात ठरवलं होतं. सगळ्यांना विशेषत: वडिलांना निर्घृणपणे संपवायचं ठरवलं होतं असं केशवनं पोलिसांना सांगितलं. वर्षभरापूर्वी माझं प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे मी पूर्णपणे कोलमडलो. त्या दरम्यान कुटुंबातील कोणीही मला आधार दिला नाही. उलट वडील मला ओरडले, अशी माहिती केशवनं पोलिसांना दिली. केशवनं वडिलांना २० वेळा चाकूनं भोसकलं.
youth kills his family, वडील २० मिनिटं ओरडले, संतप्त मुलानं २० वेळा…; कुटुंब संपवणाऱ्या लेकाचा भयानक प्रकार – delhi palam 25 year old ends life of 4 persons of family stabs father 20 times
नवी दिल्ली: दिल्लीतील पालममध्ये एका कुटुंबातील चार जणांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी केशवला अटक केली आहे. केशवनं त्याच्या आई, वडिलांची, बहिणीची आणि आजीची निर्घृणपणे हत्या केली. केशवनं वडिलांवर चाकूनं २० सपासप वार केले. बुधवारी सकाळी कौटुंबिक वाद झाला. यामुळे संतापलेल्या केशवनं चौघांना संपवलं. केशव काही महिन्यांपूर्वीच नशामुक्ती केंद्रातून घरी परतला होता.