Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Nov 2022, 5:37 pm

Jalgaon News : अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भडगाव शहरात काल घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे.

 

extreme incident of holding a woman hand trying to set her on fire (1)
महिलेचा हात पकडत अतिप्रसंग, विरोध करताच पेटवण्याचा प्रयत्न; जळगावात खळबळ
जळगाव : अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भडगाव शहरात काल घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेच्या सुमारास भडगांव शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे एक ५० वर्षीय अनोळखी पुरुषाने ४७ वर्षीय पिडीत विवाहितेचा हात पकडून अश्लील संवाद करत अश्लील कृत्य केले. तसेच यानंतर त्याने पिडीतेवर अतिप्रसंग केला. पिडीत महिलेने विरोध करताच पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंगात तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पॅट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णाच्या ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.

Jitendra Awhad: रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय; जितेंद्र आव्हाड संतापले
दरम्यान, पिडीत महिलेवर जळगाव शहरातील रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.

विरोधकांना 50 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल | गुलाबराव पाटील

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here