२०१५ मध्ये सापडलेला दगड डेविड यांनी स्वत:कडे जपून ठेवला. कित्येक वर्षांनंतर डेविड तो दगड घेऊन मेलबर्न म्युझियममध्ये घेऊन गेले. त्यावेळी मिळालेली माहिती ऐकून डेविड यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. डेविड दगड समजत असलेली वस्तू दुर्मीळ उल्कापिंड होती. दुसऱ्या जगातून ते ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पडलं होतं.
डेविड यांना सापडलेलं उल्कापिंड अतिशय मौल्यवान असल्याचं मेलबर्न म्युझियमचे जियोलॉजिस्ट डर्मोट हेन्री यांनी सांगितलं. डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची किंमत ठरवताच येणार नाही. कारण त्यात असलेला धातू पृथ्वीवर मिळतच नाही, असं हेन्री म्हणाले. हेन्री ३७ वर्षांपासून म्युझियममध्ये कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी अनेक दगडांची तपासणी केली आहे. उल्कापिंडदेखील तपासले आहेत.
मी आतापर्यंत हजारो उल्कापिंडांची तपासणी केली आहे. डेविड यांना सापडलेलं उल्कापिंड अत्यंत मौल्यवान आहे. त्याची किंमत निश्चित केली जाऊ शकत नाही, असं हेन्री म्हणाले. त्यांनी डेविड यांना सापडलेल्या उल्कापिंडाची तपासणी केली. हे उल्कापिंड ४६० कोटी वर्ष जुनं आहे. त्याचं वजन १७ किली आहे. उल्कापिंड कापायचं असल्यास हिरे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचा वापर करावा लागेल, अशी माहिती हेन्री यांनी दिली.