सानियानं शेअर केलेल्या पोस्टचं कॅप्शन लक्षवेधी आहे. ‘तुम्ही प्रकाश आणि अंधरापासून तयार झालेला माणूस आहात. थोडं कमकुवत वाटत असल्यास स्वत:ला पुरेसं प्रेम द्या. जेव्हा अंतकरण जड वाटत असेल तेव्हा स्वत:ला ब्रेक द्यायला शिका,’ असं मजकूर सानियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे.
सानियानं याआधीही अशा प्रकारच्या उदासवाण्या पोस्ट केल्या आहेत. याआधी तिनं मुलाचा फोटो शेअर केला होता. कठीण वेळ आहे, असं तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. त्याच पोस्टनंतर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चेनं जोर धरला. सानिया तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून सातत्यानं इमोशनल पोस्ट शेअर करत आहे.
सानियानं काही दिवसांपूर्वी केलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. तुटलेली मनं कुठे जातात? अल्लाला शोधतात का? अशी प्रश्नार्थक पोस्ट सानियानं केली होती. मात्र मुलाच्या वाढदिवसाला सानिया आणि शोएब एकत्र दिसले. त्यावेळी सानियानं केलेली पोस्टही लक्षवेधी होती. ‘जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा आम्ही अधिक विनम्र झालो आणि आयुष्य आमच्यासाठी विशेष होतं. आपण भले सोबत नसू आणि रोज भेटत नसू, मात्र बाबा प्रत्येक क्षणी तुझ्या आणि तुझ्या हास्याचा विचार करतो. तू अल्लाहकडे जे मागतोस, ते सर्व तुला मिळावं,’ असं सानियानं पोस्टमध्ये म्हटलं होतं.