मुंबई: बिस्लेरी विकण्याचा निर्णय कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी घेतला आहे. कंपनी सांभाळण्यासाठी आपल्याकडे कोणीच नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. माझं वय झालंय आणि माझ्या मुलीला व्यवसायात फारसा रस नाही. त्यामुळे कंपनी विकण्याचा निर्णय घेतल्याचं चौहान यांनी सांगितलं. यावेळी ते काहीसे भावुक झाले होते.

अनेकदा कौटुंबिक व्यवसायावरून पुढच्या पिढीत वाद होतात. देशातील बड्या कुटुंबांमध्ये आपण असे वाद पाहिले आहेत. मात्र चौहान कुटुंबात वेगळीच परिस्थिती आहे. बिस्लेरी कुटुंबाचे मालक असलेल्या रमेश चौहान यांना एकच मुलगी आहे. जयंती चौहान या ३७ वर्षांच्या आहेत. त्या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या वाईस चेअरपर्सन आहेत. वयाची २४ वर्षे पूर्ण झाल्यापासून त्या कौटुंबिक व्यवसायात लक्ष घालत आहेत.
सोनं समजून कित्येक वर्षे दगड जपून ठेवला; पण तो सोन्याहून भारी निघाला; लॉटरीच लागली ना भाऊ
जयंती यांनी आधी दिल्ली कार्यालयाची जबाबदारी सांभाळली. २०११ पासून त्यांनी मुंबई कार्यालयात लक्ष घातलं. जयंती यांच्या नेतृत्त्वाखालीच दिल्ली कार्यालयाची सुरुवात झाली. बिस्लेरीला आंतरराष्ट्रीय ब्रँड करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कंपनीच्या जाहिरात आणि विपणन विभागाची जबाबदारी त्यांनी उत्तम हाताळली. कंपनीत ऑटोमेशन प्रोसेसची सुरुवात त्यांनीच केली.

ब्रँड म्हणून बिस्लेरीची प्रतिमा निर्माण करण्यात जयंती यांनी मोलाची भूमिका बजावली. जाहिरातीसोबतच प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवरही त्यांनी विशेष लक्ष दिलं. मार्केटिंगसोबतच ब्रँड मॅनेजमेंट आणि डिजिटल मार्केटिंग यातही जयंती यांना विशेष रस आहे. आक्रमक ऍड कॅम्पेन राबवण्याचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलं आहे.
प्रियकराला कॉल केला, दुसऱ्याच तरुणीनं उचलला; भडकलेल्या प्रेयसीनं बॉयफ्रेंडचं घर पेटवलं; पण…
जयंती यांचं लहानपण मुंबई, दिल्ली आणि न्यूयॉर्कमध्ये गेलं. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी दिल्लीत घेतलं. त्यानंतर फॅशन डिझायनिंगच्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या. लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून त्यांनी फॅशन डिझायनिंगमधील पदवी घेतली. यानंतर istituto marangoni milano मधून फॅशन स्टायलिंगचा कोर्स केला. जयंती सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.

जयंती यांना बिस्लेरीचा व्याप वाढवण्यात, तो हाताळण्यात रस का नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जयंती यांना फॅशनशी संबंधित व्यवसायावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात, असं जयंती यांनी लिंक्डइन प्रोफाईलवर म्हटलं आहे. त्यांच्या पोस्टवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here