ठाणे : भिवंडी शहरातील भाजप नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावेळी टोळक्याने नित्यानंद नाडर यांना बेदम मारहाण करत त्यांची कार फोडण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत वादातूनच माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जखमी नगरसेवक नित्यानंद नाडर यांनी केला आहे. तसंच याप्रकरणी त्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही नाडर यांनी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात नेमकी काय करवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.