आफताबनं हिंदीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीत दिली. बऱ्याचशा प्रश्नांना त्यानं एक-दोन वाक्यात उत्तरं दिली. अनेक प्रश्नांवर तो फक्त हसत होता. तू दृश्यम चित्रपट पाहिलास का, असा प्रश्न पोलिसांनी विचारला. त्यावर आता तर दृश्यम-२ देखील आलाय, असं उत्तर आफताबनं दिलं. अनेक प्रश्नांना आफताबनं आठवत नाही अशीदेखील उत्तरं दिली.
श्रद्धाचा खूप पूर्वनियोजित होता की अचानक झाला, असा प्रश्न आफताबला अनेकदा विचारण्यात आला. या प्रश्नाला आफताब सतत खोटी उत्तरं देत आहेत. आफताबनं श्रद्धाला संतापाच्या भरात संपवलेलं नाही. त्यानं यासाठी बऱ्याच दिवसांपासून कट रचला असल्याची खात्री पोलिसांना पटली आहे.
पोलिसांनी न्यायालयाला रिमांड लेटर सोपवलं आहे. त्यात एका ‘नोट’चा उल्लेख आहे. आम्हाला आफताबकडे एक नोट सापडली आहे. त्यात मृतदेहांच्या सगळ्या तुकड्यांचा हिशोब आहे. मृतदेहाचा कोणता तुकडा कुठे टाकला याची नोंद नोटमध्ये आहे, असं पोलिसांनी रिमांड लेटरमध्ये नमूद केलं आहे.
आफताब पोलिसांसमोर घाबरलेला दिसत नाही. तो त्रासला आहे, संकटात सापडला आहे असं त्याच्या देहबोलीतून जराही जाणवत नाही. त्याचे हावभाव पोलिसांना कोड्यात टाकत आहेत. पोलिसांसमोर आफताब अतिशय रिलॅक्स असतो. त्याची देहबोली अगदी सामान्य असते.