Gunaratna Sadavarte in Osmanabad | यावेळी सदावर्ते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील देखील होत्या. त्यांच्याकडे पाहत सदावर्ते यांनी म्हटले की, हे असं खरं प्रेम सोबत ठेवायचं असतं. म्हणजे कोणीही तुमच्यावर विनयभंगाचे आरोप करु शकत नाही. आपण समाजातील महिला-भगिनींचा मान राखलाच पाहिजे, असे सदावर्ते यांनी म्हटले. ठाण्यातील घटनेसंदर्भात सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले.

 

Gunaratna Sadavarte Vs Jitendra Awhad
गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

हायलाइट्स:

  • गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले
  • स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाच्या तक्रारी होत नाहीत
उस्मानाबाद: ठाण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने केला होता. मात्र, यामागे पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाच्या तक्रारी होत नाहीत, असे सदावर्ते यांनी म्हटले. ते शुक्रवारी उस्मानाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Independent Marathwada Parrishad in Ramnad Maharashtra)

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ओ जितेंद्र आव्हाड, ओ शरद पवार स्वत:ची बायको सोबत ठेवली तर विनयभंगाचे आरोप होत नसतात. यावेळी सदावर्ते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील देखील होत्या. त्यांच्याकडे पाहत सदावर्ते यांनी म्हटले की, हे असं खरं प्रेम सोबत ठेवायचं असतं. म्हणजे कोणीही तुमच्यावर विनयभंगाचे आरोप करु शकत नाही. आपण समाजातील महिला-भगिनींचा मान राखलाच पाहिजे, असे सदावर्ते यांनी म्हटले. ठाण्यातील घटनेसंदर्भात सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. या प्रकरणात राष्ट्रवादीची जातीय मानसिकता लक्षात येते. तुम्ही एका अत्याचारित महिलेला जातीय टीका करतात. याप्रकरणात महिला आयोग नक्की कारवाई करेल, अशी माझी भावना असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले.

स्वतंत्र मराठवाडा परिषदेसाठी गुणरत्न सदावर्ते उस्मानाबादमध्ये होते. यावेळी मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी रोडमॅप तयार करायचा आम्ही आलो आहोत. सकाळपासून कष्टकऱ्यांना पिटाळून लावण्यात आलं. या सर्व चौकशीच्या बाबी आहेत. साडेचार वाजता चक्र फिरले आणि दारं उघडले. याला म्हणतात रयतेचं सरकार, असेही सदावर्ते यांनी सांगितले.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर सदावर्तेंचं भाष्य

दिल्लीत एका भगिनीची हत्या झाली. त्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बिळातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कलम ३४ खाली आरोपी करून गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

सुषमा अंधारेंचा सदावर्ते यांच्यावर पलटवार

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पलटवार केला. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत:वर येरवाडा रुग्णालयात जाऊन उपचार करुन घेतले पाहिजेत. त्यांनी तरुणांची माथी भडकावू नयेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यापूर्वीही अंधारे यांनी सदावर्ते यांना फटकारले होते. गुणरत्न सदावर्ते हे कायमच आपल्या अतार्किक आणि असंबंध भाषा शैलीसाठी कुप्रसिद्ध आहेत. सदावर्तेंनी हे वकील आहेत की राजकारणी हे पहिल्यांदा ठरवावं, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here