पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सावकाराने तरुणाचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केली आहे. एका महिलेने जावयाची अडचण दूर करण्यासाठी सावकाराकडून १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. ही रक्कम घेताना जमीन गहाण ठेवली होती. तसेच तिने सर्व रक्कम व्याजासह परत देखील केली होती.

सावकाराने जमीन परत तर दिली नाहीच उलट याचा फायदा घेत संबधित महिलेच्या जावयाचे अपहरण करत मारहाण केली आहे. सागर सासवडे असे सावकाराचे नाव असून महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर सावकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.

भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत पक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप; CCTV फुटेज समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित महिलेने आपल्या जावयाला मदत करण्यासाठी शिक्रापूर येथील एका सावकाराकडून १० लाखांचे कर्ज घेतले होते. त्याची परत फेड व्याजासह १२ लाख रुपये देऊन संपूर्ण फेडले होते. मात्र, सावकाराने त्याचा फायदा घेत तिने गहाण ठेवलेली जमीन परत दिली नाहीच उलट तिच्या जावयाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून अखेर संबधित महिलेने त्या सावकाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत संबंधित सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.

संबधित सावकार हा पेशाने डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर असूनही हव्यासापोटी त्याने हे कृत्य केले असून सावकारीतून त्याने फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

लतादीदींच्या दैवी स्वरांचा निस्सिम चाहता, घरातच उभारलं सुरेख मंदिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here