औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणारे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांना आज मतदारसंघात नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. महालगाव येथे एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी रमेश बोरणारे हे एका माजी पंचायत समिती सदस्याच्या घरी गेले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात लाठ्या आणि बॅनर घेत ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गटात आठवडी बाजारात वाद निर्माण झाला. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गट व ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राजकीय चिखलफेक सुरू आहे. वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटाला समर्थन दिले तर पक्षाचे पदाधिकारी अविनाश पाटील गलांडे यांनी ठाकरे गटाला समर्थन दिले. ज्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक विविध माध्यमांवर होत होती. हा संघर्ष एवढा वाढला की, दोघांनी थेट वैजापूर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या सरला बेटावर महाराजांच्या समाधीवर हात ठेवून वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Gunaratna Sadavarte: ओ आव्हाड, ओ शरद पवार… स्वत:ची बायको सोबत ठेवली की विनयभंगाचे आरोप होत नाहीत: सदावर्ते

दरम्यान, आज पुन्हा रमेश बोरणारे हे महालगाव येथे मराठवाडा भांडी भंडार या दुकानाच्या उद्घाटनासाठी आले असता उद्घाटन आटोपून ते माजी पंचायत समिती सदस्य बापू झिंजूरडे यांच्या घरी चहापानासाठी गेले. यावेळी अविनाश गलांडे व त्यांच्या समर्थकांनी राम मंदिर परिसरात काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत आमदारांचा निषेध केला. त्यातच आमदार बोरणारे हे झिंजूर्दे यांच्या घरून परतत असताना गावाच्या वेशीजवळ पुन्हा अविनाश गलांडे यांच्या समर्थकांनी झेंडे दाखवत घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली.

या वादानंतर घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here