म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषक आणि मराठी माणसांच्या विविध संस्था, संघटनांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसाह्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यामुळे सीमाभागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच अन्य संघटनांना मुख्यमंत्री स्वेच्छानिर्णयाने या निधीतून मदत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसाह्य करण्याची तरतूद आहे. या शासननिर्णयात एका शुद्धीपत्राद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. आता नव्या शासननिर्णयानुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागांतील ८६५ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे सन २०२३-२४ करिता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.
भाजपचे मुख्यमंत्री भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करतात? सगळं स्क्रिप्टेड, राऊतांचा