Gunaratna Sadavarte | सोलापूर येथे शनिवारी गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार पडला. यावेळी सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर अचानक काळी पावडर फेकली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणबाजीला सुरुवात केली. या सगळ्या प्रकारानंतर गुणरत्न सदावर्ते बधले नाहीत. त्यांनी तात्काळा प्रसारमाध्यमांसमोर येत शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली.

हायलाइट्स:
- गुणरत्न सदावर्ते यांना काही कळायच्या आत सर्जिकल स्ट्राईक
- स्वतंत्र मराठवाडा परिषदेत सदावर्ते सहभागी झाले होते
गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आक्रमक निदर्शनं केली होती. तेव्हा पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेवेळी पोलिसांची सुरक्षा भेदून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळी पावडर फेकली. या सगळ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.