धाकट्या बहिणीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच गावातच राहणाऱ्या थोरल्या बहिणीनेही नळावर पाणी भरत असतानाच प्राण सोडले. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे काल शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.

 

jalna news
जालना: धाकट्या बहिणीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच गावातच राहणाऱ्या थोरल्या बहिणीनेही नळावर पाणी भरत असतानाच प्राण सोडले. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे काल शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे. या सख्ख्या बहिणींची एकत्रच अंतयात्रा काढून गावकऱ्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.

चंद्रभागा गंगाराम पैठणकर (६५) व गुंफाबाई हरी वाघ (६०) दोघी सख्ख्या बहिणी भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे आपापल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पहाटे नेहमीप्रमाणे गुंफाबाई दूध घेऊन घरी आल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्यांना लगेच भोकरदन येथे व त्यानंतर सिल्लोडला उपचारासाठी हलविले. पण त्यांना वाचवण्यात अपयश आले. हृदयविकाराने गुंफाबाई यांचा मृत्यू झाला.
कीर्तन करता करता मटकन खाली बसले; जमिनीवर कोसळले; पुजाऱ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू
गावात घडलेल्या या घटनेची खबर त्यांची मोठी बहीण चंद्रभागाबाई यांच्या कानावर पडली. ही दुःखद घटना त्यांना कळली तेव्हा त्या गावातील नळावर पाणी भरत होत्या. बहिणीचे दुःखद निधनाची बातमी कळताच त्यांना जोरदार धक्का बसला. शोकमग्न स्थितीत पाणी भरत असतानाच त्यांच्या हातातील हंडा खाली पडला आणि त्या जागेवरच कोसळल्या. कोसळताच त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला.
आईनं लेकाला मायेपोटी घरी आणलं; नशामुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलानं संपूर्ण कुटुंबाला संपवलं
दोन्ही बहिणींच्या निधनाची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. नातेवाइकांनी दोघींचे मृतदेह घरी आणले. दुपारी दोन्ही बहिणींची गावातून एकत्रच अंत्ययात्रा काढण्यात आली. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून गावातील बाया-बापड्यांना अश्रू अनावर झाले. या बहिणींवर एकाच वेळी वेगवेगळ्या चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सख्ख्या बहिणींच्या आकस्मिक निधनाने पैठणकर व वाघ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रभागाबाई पैठणकर यांच्या पश्चात तीन मुले व दोन मुली तर गुंफाबाई वाघ यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here